header ads

बोंडअळी

१) ठिपक्यांची बोंडअळी (Spotted bollworm Earias insulana):-

ठिपक्यांची बोंडअळी | thipkyachi bondali
ठिपक्यांची बोंडअळी

ठिपक्यांची बोंडअळी | thipkyachi bondali
ठिपक्यांची बोंडअळी
ठिपक्याची बोंडअळीकपाशीला पात्या येण्याच्या अगोदर प्रथम कोवळ्या शेंड्याना छिद्र पडून पोखरून खाते. त्यामुळे असे शेंडे सुकून नंतर वळतात. पात्या आल्यावर अळी पात्या, कळ्या, फुले आणि बोंडांना नुकसान पोहचविते. त्यामुळे गळ होते. ह्या किडीच्या प्रादुर्भावामुळे पात्या अधर्वट उमलतात व गळून पडतात. नुकसानग्रस्त बोंडावर संसर्गजन्य जिवाणू व बुरशीचा प्रादुर्भाव आढळतो. ह्या अळीचा प्रादुर्भाव तीन आठवड्याच्या काळापासूनच सुरु होतो पण अधिकमच प्रादुर्भाव १५ ते १६ व्या आठवड्यात असतो.

२) अमेरिकन बोंडअळी(American bollworm Helicoverpa armigera):-

अमेरिकन बोंडअळी | american bondali
अमेरिकन बोंडअळी

अमेरिकन बोंडअळी | american bondali
अमेरिकन बोंडअळी
अमेरिकन बोंडअळीच्या लहान अळ्या पात्या व कळ्यांना नुकसान पोहचवितात. मोठ्या अळ्या बोंडांना छिद्र पडून आतील भाग खाऊन पोकळ करतात. बरेचदा अळीचा अर्धा भाग बोंडा,च्या बाहेर असतो. या अळीने केलेली छिद्रे अनियमित गोल तुलनात्मक दृष्ट्या मोठी असतात. प्रादुर्भाव ग्रस्त पात्या व लहान बोंडे जी झाडावर राहतात ती पावसाच्या पाण्यामुळे सडतात, रुई खराब होते. या किडींचा प्रादुर्भाव नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत वाढू शकतो.

बोंडअळी व्यवस्थापनात :- नैसर्गिक मित्रकिडींचा तसेच रासायनिक फवारणी उपयोग

३) गुलाबी बोंडअळी(Pink bollworm Pectinophora gossypiella Saunders):-

 गुलाबी बोंडअळी | gulabi bondali
 गुलाबी बोंडअळी
गुलाबी बोंडअळी फुले व हिरव्या बोंडाना नुकसान पोहचविते. प्रादुर्भाव ग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळी सारखी दिसतात त्यांना "डोमकळी " म्हणतात. अंड्यातून निघालेली अळी बोंडात शिरल्यानंतर हे छिद्र बंद होते. बोंडामध्ये एकापेक्षा जास्त अळ्या असू शकतात. गुलाबी बोंडअळी बोंडात राहून सरकीचेही नुकसान करते. बियाण्याची उगवणशक्ती आणि तेल्याच्या प्रमाणात घट होते. बोंडाचे वरून निरीक्षण केल्यावर सुद्धा अळीचा प्रादुर्भाव ओळखता येत नाही. अळी अवस्था बोंडामध्ये पूर्ण झाल्यानंतर ही अळी कोषावस्थेत जाण्यासाठी बोंडाला छिद्र करून बाहेर पडते. प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे परिपकव न होताच फुटतात. कापसाची प्रत बिघडून उत्पादनात बरीच घट येते. 

Post a Comment

0 Comments