कापूस: कीड, बोंडअळी नियंत्रण व खतांची मात्रा या विषयी चर्चा,
नमस्कार शेतकरी मित्रांनो , कापुस हे महत्वाचे नगदी पिक आहे. महाराष्ट्रात कापुस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. क्षेत्रफळाच्या दॄटीने महाराष्ट्र राज्य हे आघाडी वर आहे. पण इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात कापुस पिकाची उत्पाकदकता फारच कमी आहे. अन्य कारणापैकी कीड़ी अणि रोगांपासून होणारे नुकसान हे महत्वाचे कारण आहे. कपाशीच्या वाढीच्या काळात विविध प्रकारच्या कीड़ी व् रोग येतात. किडीमध्ये प्रामुख्याने रसशोषक व बोंडअळ्या आहेत. ह्या किडी पाने, पात्या , फुले आणि बोंडे ह्यावर आक्रमण करतात. सुरुवातीला वाढीच्या काळात रसशोषक किडीचा प्रादुर्भाव असतो तर पात्या, फुले आणि बोंडे भरण्याच्या काळात टिपक्याची बोंडअळी ,हिरवी बोन्डअळी व गुलाबी बोंडअळी प्रामुख्याने आढळतात. बोंडअळीमुळे पात्या, फुले व बोंडगळ आढळून येते. बीटी कपाशीमुळे बोंडअळीपासून चांगले संरक्षण मिळते पण गैरबीटी कपाशीवर ह्याचा प्रादुर्भाव बघावयास मिळतो. रोगांमुळे मूळकुजव्या रोग, मर रोग, पानावरील चट्टे, करपा दहिया ह्या रोगांचे संरक्षण होते. किडी आणि रोगांचे वेळेवर नियंत्रण न केल्यास उत्पादनात ९० टक्क्यापर्यन्त घट येऊ शकते.वरील सांगितल्या प्रमाणे किडी आणि बोंडअळी पासून कपाशीचे कशा प्रकारे संरक्षण करता येईल , तसेच कपाशी साठी लागणारी खतांची मात्रा या विषयी आपण पुढील पोस्ट मध्ये चर्चा करु. धन्यवाद!
0 Comments