header ads

नैसर्गिक मित्रकिडी

१) सहा वळणदार ठिपक्याचा ढालकिडा (Six Spotted lady bird beetle 


Cheilomenes sexmaculata):-

सहा वळणदार ठिपक्याच्या ढालकिडा | saha walndar thipkyacha dhalkida
सहा वळणदार ठिपक्याच्या ढालकिडा
सहा वळणदार ठिपक्याच्या ढालकिडा | saha walndar thipkyacha dhalkida
सहा वळणदार ठिपक्याच्या ढालकिडा
सहा वळणदार ठिपक्याच्या ढालकिडा हा भक्षक कीड आहे. या मित्र कीटकाचे प्रौढ व अळ्या कपाशीवरील 
पांढरी माशी, मावा, तुडतुडे, कोळी आणि सुरुवातीच्या काळातील बोंडअळ्या या किडींवर जगतात. त्यामुळे पिकांवरील शत्रुकीडीची संख्या कमी होण्यास मदत होते. 

२) पिठ्या ढेकूण विनाशक ढालकिडा (Mealybug destroyer Cryptolaemus montrouzieri):- 
पिढ्या ढेकूण विनाशक कीड | pidhya dhekun vinashak kid
पिढ्या ढेकूण विनाशक कीड
पिढ्या ढेकूण विनाशक कीड | pidhya dhekun vinashak kid
पिढ्या ढेकूण विनाशक कीड

पिढ्या ढेकूण या कीटकाचे प्रौढ व अळ्या, मावा, कोळी व मृदू शरीराच्या किडीं जे फळे, फुले, भाजीपाला, कॉफी, तुती ह्या पिकांवर वाढतात त्यावर हि पिढ्या ढेकूण विनाशक कीड त्यांचे भक्षण करते व ह्यांची संख्या कमी करण्यास मदत करतात. 

३)हरित पंखी क्रायसोपा (Green lacewings Chrysopa Chrysoperla carnea):-
हरित पंखी क्रियसोपा  | harit pankhi criysopa
हरित पंखी क्रियसोपा
हरित पंखी क्रियसोपा  | harit pankhi criysopa
हरित पंखी क्रियसोपा

हरित पंखी क्रियसोपा या कीटकाच्या अळ्या सक्रिय परभक्षी असतात. त्या मावा, फुलकिडे, पांढरी माशी, तुडतुडे किडीची अंडी इत्यादी वर जगतात. तसेच प्रौढ फुलांतील पराग, मावा किडीच्या अंगातून निघणारा गॉड चिगट पदार्थ आणि फुलरस यावर जगतात. हि कीड कपाशीवरील पांढरी माशी आणि मावा यांचे प्रभावीपणे नियंत्रण करते.

४) सिरफीड माशी (Hoverfly Eupeodes confrater):-
सिरफीड माशी | sirphid mashi
सिरफीड माशी
सिरफीड माशी | sirphid mashi
सिरफीड माशी

परभक्षी सिरफीड माशीच्या अळ्या मावा किडीवर जगतात तसेच प्रौढ किडे परागकण स्थलांतरित करतात. हा किटक प्रामुख्याने कपाशी, गहू, मोहरी, फुलकोबी, डाळिंब आणि शेवंती वरील मावा यावर जगतो. या कीटकाच्या अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्याना पुरेसे अन्न मिळण्याच्या हेतूने मादी मावा किडीच्या वसाहतीमध्ये अंडी देते. या कीटकाच्या अळ्या फक्त मावा किडीवरच जगतात.










Post a Comment

0 Comments