पूर्व हंगाम आणि हंगामात किडीची संख्या कमी राखण्यासाठी मशागतीय, यांत्रिक आणि भौतिक पद्धतीचा अवलंब करावा.
फनल ट्रॅप |
पिवळे चिगट सापळे |
बीटी / गैर बीटी कपाशीसाठी :-
- नोट:- शेतामध्ये कुठल्याही रासायनिक फवारणी करताना सेव्हर (स्टिकर) १० मी. ली. प्रति पंप वापरणे गरजेचे आहे. सेव्हर चा उपयोग केल्याने फवारलेले औषध हे पानांवर चिकटून राहते. जेणे करून औषध पूर्ण लागू होतील.
अ. क्र.
|
मशागतीय, यांत्रिक आणि भौतिक पद्धत:-
|
लक्ष्य किडी
|
परिणाम
|
१.
|
गैर बीटी कपाशी (२०% Refuge) बीटी कपाशी भोवती पेरावे
|
हिरवी बोंडअळी, ठिपक्याची बोंडअळी, गुलाबी बोंडअळी
|
बीटी कपाशीला बोंडअळ्यांचे प्रतिकार करण्यास विलंब
|
२.
|
हंगामात व बिगर हंगामात कपाशीच्या काड्या व तणांचा नाश
|
पिढ्या ढेकूण, पांढरी माशी
|
किडींचा प्रादुर्भाव पुढील हंगामात वाहून नेणे कमी करते.
|
३.
|
तूर / बाजरी / ज्वारी / मका/ पिकाच्या कपाशीच्या मध्ये ओळी लावाव्या
|
पिढ्या ढेकूण
|
भौतिक अडथळा म्हणून कार्य करतात आणि त्यामुळे प्रसार नियंत्रण होते
|
४.
|
पिवळा चिकट सापळा लावावा
|
पांढरी माशी
|
पांढरी माशी निरीक्षण व व्यवस्थापनासाठी
|
५.
|
भेंडी ची लागवड टाळावी
|
तुडतुडे, पांढरी माशी, हिरवी बोंडअळी, ठिपक्यांची बोंडअळी
|
किडींचे
सर्वात आवडते पीक संख्या व प्रादुर्भाव वाढविण्यासाठी मदत करते. |
६.
|
प्रादुर्भाव ग्रस्त झाडांचा व तणांचा नायनाट
करावा |
पिढ्या ढेकूण
|
पुढील प्रसार थांबते.
|
७.
|
हंगाम काळात शेतीकामात उपयोगी येणाऱ्या
जनावरांची / अवजारांची / मजुरांची ये-जा टाळावी |
पिढ्या ढेकूण
|
पिढ्या ढेकूण प्रादुर्भाव
प्रसार कमी करते |
८.
|
खोडवा पीक
घेणे टाळावे |
पिढ्या ढेकूण, गुलाबी
बोंडअळी |
किडींचा
पुढील प्रसार थांबवते |
गैर बीटी कापशीसाठी :-
९.
|
कपाशी
पिकांची वाढ हंगामाबाहेर होऊ देऊ नये |
हिरवी
बोंडअळी, ठिपक्यांची बोंडअळी, गुलाबी बोंडअळी |
किडींचा
पुढील प्रसार थांबवते |
१०.
|
पूर्व हंगामी
खोल मशागत करणे |
हिरवी
बोंडअळी, तंबाकूची पाने खाणारी अळी |
पक्षांच्या
भक्षणामुळे आणि जास्त तापमानामुळे कोष मृत होतात |
११.
|
झाडांची
प्रादुर्भावग्रस्त शेंडे काढणे |
ठिपक्यांची
बोंडअळी |
प्रादुर्भाव
कमी करते |
१२.
|
अंडीपुंज व
खाणाऱ्या अळ्या जमा कराव्या व नष्ट कराव्या |
तंबाखूची पाने खाणारी अळी
|
किडींची
संख्या वाढ व प्रादुर्भाव कमी होतो |
१३.
|
खराब उमललेली बोंडे जमा करावी आणि नष्ट करावी शेवटची वेचनी झाल्यावर गुरे,मेंढीव शेळी
चरायला सोडावे |
गुलाबी
बोंडअळी |
किडींचा
पुढील प्रसार थांबवते |
0 Comments