header ads

रोगांची ओळख

१) मूळकुजव्या रोग(Root rot Rhizoctonnia solani ):-
मूळकुजव्या रोग | mulkujvya rog
मूळकुजव्या रोग
मूळकुजव्या रोग | mulkujvya rog
मूळकुजव्या रोग

हा रोग रायझोक्टोनिया सोलॅनी , रायझॊक्टॉनिआ बटाटीकोला किंवा स्क्लेरोशियम रॉल्फसाय या बुरशीमुळे होतो. जमिनीचे तापमान ३५ अंश से. किंवा या पेक्षा जास्त असल्यास रोग तीव्र स्वरुपात आढळतो. रोपटे चार ते पाच आठवड्याचे असतानाच रोगाची लक्षणे दिसू लागतात. या रोगामध्ये रोपे कोमेजतात. पाने वाळतात व गळून पडतात. रोगट झाडे जमिनीतून लवकर काढल्यास अशी रोगात मूळ पूर्णपणे कुजलेले असते. झाड उपटून काढीत असता तंतूमय मुळे जमिनीतच राहतात व फक्त सोटमूळ वर येते. सोटमुळावरची साल सोटमुळापासून अलग होते. कुजलेल्या सालीवर स्क्लेरोशिया तयार होतात. हा रोग मुख्यतः रोपट्यांवर येतो.

२) मर रोग(Fusarium wilt Fusarium oxysporum f.sp. vasinfectum):-
मर रोग | mar rog
                                   मर रोग
मर रोग | mar rog
मर रोग

मर रोग हा फुझारियम या बुरशीमुळे होते. रोपे लहान असताना पाने पिवळी किंवा करड्या रंगाची पडतात. रोगट रोपे वळतात व मारतात. मोठ्या झाडाची पाने मलूल व पिवळी होवुन वाळतात. सुरुवातीला झाडाच्या खालच्या भागावरील पाने मलूल होतात व नंतर वरची होतात. मलूल झालेली सर्व पाने गळून पडतात. अशा प्रकारच्या रोगात झाडाच्या जमिनीलगतच्या खोडाचा भाग काळसर रेषा दिसतात. रोगट झाडाचे खोड व मूळ मधोमध उभे चिरून पाहिल्यास आतील भागावर काळसर रेषा दिसतात. रोगट झाडे मारतात. जमिनीमध्ये असणारी बुरशी मुळाद्वारे खोडामध्ये प्रवेश करते.


रोगांचे व्यवस्थापन :- लागवडी पूर्वी व नंतरच्या रासायनिक फवारणी नियोजनासाठी येथे क्लिक करा.
https://mahashetkari.blogspot.com/2019/07/rog-niyantran.html

३) अनुजीवी करपा (Bacterial leaf blight Xanthomonas axonopodis pv. malvacearum):-
अनुजीवी करपा | karpa
                                   अणुजिवी करपा
अनुजीवी करपा | karpa
अणुजिवी करपा

कपाशीवरील अनुजीवी करपा हा रोग अनुजीवीमुळे होतो. या रोगामुळे ३५ ते ५०% उत्पादनात घट होते. या रोगामुळे पानातील हरितद्रव्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे कर्बग्रहणाची क्रिया मंदावते व या कारणास्तव बोंडे लहान असतानाच गळून पडतात, तसेच बोंडे सडतात. बोंडांच्या आतील कापसाचा रंग पिवळसर होतो. पर्यायाने शेतकऱ्यांना आर्थिक नुकणास सहन करावे लागते. करपा या रोगाची लक्षणे पाने, खोडे बोंडे यावर आढळतात. या  रोगाचा प्रसार रोगग्रस बियाणे अथवा रोगग्रस्त जमिनीतून होतो. पानावर प्रथम कोनात्मक, तेलकट स्वरूपाचे व नंतर काळसर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. पानाच्या शिरा व झाडाच्या फांद्या काळ्या पडतात. कालांतराने पाने गळून पडतात. बोंडावर तेलकट व काळपट डाग पडतात. बोंडे उमलत नाही. कापसाची प्रत खालावते.

Post a Comment

0 Comments