header ads

प्रस्थावना

ऊस 

                 ऊस हे एक महत्वाचे नगदी पीक असुन या पिकामुळे ग्रामीण भागातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक परिस्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. उसाखालील क्षेत्रामध्ये भारत जगाच्या तुलनेत आघाडीवर आहे. ऊस ही भारतात तसेच दक्षिण आशियातील इतर देशांत प्राचीन काळापासून लागवडीत असलेली एक बहुवार्षिक गवताची जात आहे.
                    सहकारी साखर उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षण, दवाखाने, प्रशिक्षण कार्यक्रम, पाणीपुरवठा इ. विकासाच्या बाबींमध्ये तसेच दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन इ. पूरक उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
sugarcane | ऊस
ऊस
                     उसाच्या यशस्वी लागवडीमध्ये आपण जामीन, हवामान, उसाच्या प्रचलित जाती, पूर्व मशागत, आंतरपीक, आंतरमशागत, बेसल ढोस, उसाची लागण, बेणे निवड, रोपे तयार करण्याची योग्य पद्धत  इ. या सर्व गोष्टींवर आपण सखोल चर्चा करणार आहोत. ऊस पिकाच्या संगोपनात इतर काही महत्वाच्या गोष्टीं वर लक्ष देणं तेवढंच गरजेचे आहे. त्यामध्ये उसावरील रोग, किडी त्यांचा कालावधी आणि त्यांचे नियंत्रण योग्य वेळी केल्यास ऊस उत्पादनात नक्कीच वाढ होऊ शकते. हल्लीच्या काळात शेतकरी आता हळूहळू आधुनिक शेतीकडे वळत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आता कमीतकमी ६० ते ७० टनापासून आता  १०० ते  १२० टन सहजरित्या  काढत आहे.
                  उसाच्या विक्रमी उत्पादनासाठी फक्त रासायनिक खतांचा भडीमार करून उपयोग नाही, अतिरिक्त रासायनिक खतामुळे जमिनीची प्रत खालावते. त्यामुळे पुढील पिकाच्या उत्पादनात गट दिसून येते, तसेच जमिनीची सुपीकताही कमीकमी होत चालली आहे. रासायनिक खतांचा योग्य व गरजेनुसार वापर केल्याने जमिनीचे जास्त नुकसान आपण टाळू शकतो. जमिनीच्या सुपीकतेसाठी जैविक खतांचा वापर केल्याने उत्पादनात जास्त वाढ दिसून येते. सध्याचा बाजारभाव लक्षात घेता शेतीमध्ये कमी खर्चात आणि कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पदान काढण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. चला तर मग उसासंदर्भात आपण पुढे सखोल चर्चा करू, धन्यवाद.





Post a Comment

0 Comments